वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलची सत्ताची सत्ता बसली. ईश्वर चिठ्ठीने सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे तर उपसभापती जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांची नियुक्ती झाली.
स्थानिक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि. २९ एप्रिल रोजी पार पडली होती. त्यानुसार शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे ९ उमेदवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या शेतकरी विकास पैनलचे ८ उमेदवार तर एकनाथ शिंदे गटाचा एक उमेदवार असे एकूण १८ उमेदवार निवडून आलेले होते. स्पष्ट बहुमत कोणत्याच पैनलला प्राप्त न झाल्याने शेवटी आज (दि. १२) ला एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार नितीन मत्ते हा धानोरकर गटाला जावून मिळाल्याने दोन्ही पैनल कडे समान उमेदवार झालेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारीद्वारे दोन ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आल्या. ईश्वर चिठ्ठीनुसार शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे डॉ. विजय रामचंद्र देवतळे यांची सभापतीपदी तर जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांची उपसभापतीपदी निवड झाली. तर उर्वरीत संचालक मंडळात शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे संचालक दत्ता बबनराव बोरेकर, विठ्ठल त्र्यंबक भोयर, अभिजित गिरीधर पावडे, सौ. कल्पना ओकेश्वर टोंगे, सौ. संगिता वासुदेव उरकांडे, राजेश वामनराव देवतळे, विलास शालिक झिले यांचा समावेश झाला आहे.