ब्रम्हपुरी शहरातील घरगुती ओला व सुखा कचऱ्याची उचलव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून मागील दोन महिन्यांपासून कचरा टाकावा कुठं? हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.या संबंधाने नगरसेवक मनोज वठे यांनी नागरिकांना सोबत घेऊन मा.मुख्याधिकारी न. प. यांना निवेदन दिले.
ब्रम्हपुरी शहरातील कचऱ्याची उचल करणाऱ्या एकूण ०७ घंटागाड्या आहेत,त्यापैकी ०४ गाड्या मागील दोन महिन्यांपासून ना दुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.एक एक आठवडा घंटागाडी कचरा घेण्यासाठी येत नाही.त्यामुळे अनेकांनी कचरा घरी साठवून ठेवलेला आहे. तसेच या कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
सदर कचरा गाडी दुरुस्तीची पद्धत चुकीची असून त्या करिता वार्षिक एजन्सी नेमण्यात यावी अशी विनंती निवेदना द्वारे करण्यात आली.
मा. मुख्याधिकारी यांनी सदर अडचण लवकरात लवकर सोडविली जाईल व वार्षिक एजन्सी नेमण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले.
या प्रसंगी स्वप्नील अलगदेवे, अमित रोकडे, धनपाल हटवार सर,प्रवीण राऊत, नेकलेश नंदुरकर, कौशिक खोब्रागडे,केतन पेशने उपस्थित होते