पिक विमा काढण्यात शासनाने 31 जुलै तारीख दिली मात्र मान्सून सत्र आणि शेती हंगाम सुरू झाल्याने अनेक शेतकरी कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना 8-10 किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या किंवा इंटरनेट असलेल्या मोठ्या गावाच्या ठिकाणी जावा लागतो, त्यामुळे पिक विमा नोंदी करीता मुदतवाढ देण्यात यावी व ज्या ठिकाणी नेटवर्क ची अडचण आहे अश्या गावात तलाठ्या मार्फत पिक विम्याची ऑफलाइन पद्धतीने सुद्धा नोंदणी करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.