कारंजा (लाड) : कारंजा नगर पालीकेला लाभलेल्या,हजरजवाबी तथा कर्तव्यतत्पर मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी कारंजा नगर पालिकेचा मुख्याधिकारी म्हणून पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी न.प.अंतर्गतच्या सर्वच विभागातील लोककल्याणकारी कामाची पाहणी करून,सर्व विभाग प्रमुखांना विकासाची कामे करण्याचे निर्देष देवून पुढील वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे लवकरच दिव्यांग विभागाची पाहणी करून त्यांनी दिव्यांगाना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने नगर पालिकेचे 'दिव्यांग कल्याण केंद्र' सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करीत, जाणता राजा चौक छत्रपती शिवाजी महाराज नगर कारंजा येथे दि.१७ ऑक्टोंबर पासून दिव्यांग कल्याण केन्द्र सुरू होत आहे.या शिवाय नगर पालीका हद्दीतील न.प. कार्यालयात नोंद असलेल्या युडी-आयडी धारक,दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी नगर पालीकेच्या राखीव ५% निधी मधून प्रत्येक दिव्यांगाना दिवाळीपूर्वी मानधन देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या या सकारात्मक कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्याकरीता कारंजा येथील महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी सोमवार,दि. १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना संस्थेतर्फे पुष्पगुच्छ व 'आभार-पत्र' देवून त्यांच्या दिव्यांग कल्याणाच्या भावनिक कार्याचा गौरव केला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी रमजान कालू बेनीवाले, हसन पटेल, प्रदिप वानखडे,सैयद हारुण सैयद हनिफ,उमेश अनासाने, कैलास हांडे,रोहीत महाजन आदी उपस्थित होते.