स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक पद ते लोकसभा सदस्य किंवा प्रधानमंत्री पदापर्यंत जर कार्यकर्त्याला जायचे असेल तर त्याने राजकारण करण्यापूर्वी समाजकारण करणे गरजेचे असते. लक्षात घ्या तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर मोठयांच्या संगतीपेक्षा लहानांशी संगत करा. श्रीमंतांपेक्षा गोरगरीब तळागाळातील लोकांना जवळ करा. अहो मोठ्याची संगत केली तर तो तुमच्या कडून अपेक्षाही मोठ्याच करणार. जसे की शिक्षणसंस्था द्या. बिअरबारचा परवाना मिळवून द्या . पेट्रोलपंप परवाना द्या. एखादा उद्योगधंद्यांकरीता करोडोचे कर्ज द्या. आणि एवढे तुम्ही त्याला करुन दिले . म्हणजे तो तुम्हाला पूर्णतः विसरून, प्रसंगी तुम्हाला लाथाडून, स्वतःच राजकारण करायला मोकळा होतो . ही आजची राजकिय वस्तुस्थिती आहे. परंतु ग्रामीण भागात राहणारे तळागाळातील गोरगरीब, शहरात राहणारे वस्त्या वाड्या वरील गोरगरीब, पालावर राहणारे भटके विमुक्त, शेतमजूर, निराधार, विधवा, दिव्यांग ही मंडळी मात्र १००% विश्वासू असतात . या लोकांचा मात्र कोणताच स्वार्थ नसतो. यांच्या मागण्या हया अगदीच किरकोळ किंवा सार्वजनिक स्वरूपांच्या असतात. यांना रॅशनकार्ड हवे असते, श्रावण बाळ योजना किंवा विधवा महिलांना आर्थिक मदत, रहाण्यास शासकिय योजनेतून घरकुल किंवा यांच्या वाड्या वस्त्यावर रस्ते, नाल्या, स्ट्रिटलाईट पोलवर एखादा प्रकाशाकरीता लाईट हवा असतो. आणि यांना जर एखाद्या कार्यकर्त्याने मदत मिळवून दिली. तर हे गोरगरीब त्याला देवच मानतात.
त्याच्याशी मरेपर्यंतही बेईमानी करीत नाहीत. उलट हे गोरगरीब त्या कार्यकर्त्याला खांद्यावर उचलून, नेता करून राजसिहासन मिळवून दिल्या शिवाय राहत नाहीत. कार्यकर्त्याचा - कार्यकर्ता ते नेता असा उद्धार हा केवळ आणि केवळ तळागाळातील गोरगरीब मतदारांच्या आशिर्वादानेच होत असतो. गोरगरीबांच्या आशिर्वादात तुम्हाला नगरसेवक,सरपंच, आमदार,खासदार म्हणून निवडून देण्याची महाशक्ती असते. तसी बलाढय शक्ती मोठ्यात मोठ्या श्रीमंत मतदारामध्ये सुद्धा असू शकत नाही. याची अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. अलिकडेच आपण आज राज्यमंत्री पदावर पोहोचलेल्या बच्चुभाऊ कडू, मुर्तिजापूरचे आमदार हरिश पिंपळे यांचा राजकिय इतिहास आपण अभ्यासला तर आपणास कळून येईल की, गोरगरीब तळागाळातील लोकांच्या मतांमुळे आणि आशिर्वादानेच ह्या मंडळींना राजयोगाची प्राप्ति हाऊन हे आमदार मंत्री झाले आहेत.तेव्हा आता होऊ घातलेल्या कारंजा नगर पालिका निवडणूकीचे उमेद्वार नगरसेवकाच्या सिहासन प्राप्ती करीता तळागाळातील गोरगरीबांचे आशिर्वाद घेण्याकरीता त्यांना सहकार्य करणार काय ? हे येत्या दिवसात बघावे लागणार आहे. असे प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत समाजसेवी संजय कडोळे कारंजा यांनी म्हटले आहे .