अकोला :-सोयाबीन यंदा कमी येत असून शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे 4892रुपये अकराशे आठ भावांतर भाव देऊन सोयाबीन सहा हजार रुपये राज्य शासनाने खरेदी करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्याकडे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र येथील शेतकरी सोयाबीन चा उत्पादन करतात यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे किती पाहिजे किती पाहिजे मुख्यमंत्री असताना भावांतर योजना सुरू करणारे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नामदार शिवराज सिंह चव्हाण देशाचे कृषिमंत्री असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना जपणारा केंद्रीय कृषिमंत्री न्याय व व शेतकऱ्यांच्या भावना समजून भावांतर योजना सुरू करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास राज्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने कापूस आणि सोयाबीन , तू वर, हरभरा, शेतमाला तील जवार यासाठीयासाठी भावांतर योजना सुरू करावी व शेतकऱ्याला दिलासा द्यावा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्याकडे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी साकडे घातले आहे. सहा हजार रुपये सोयाबीन ला भाव देण्यात यावा अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली आहे आणि या दृष्टीने आज मुंबईत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या व्यथा ग्रामीण समस्या राज्य शासनाच्या अधिकारी व पदाधिकारी कडे प्रखरपणे मांडल्या.