अहेरी :- तालुक्यातील नवेगाव वेलगूर या गावातील विद्युत खांब व सदर खांबावरील तार ही खाली वाकलेली असल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला असून ते तात्काळ दुरुस्ती करा, अथवा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातुन दिला आहे. नवेगाव (वेल) परिसरात महावितरणचे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. वेलगुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नवेगाव येथील विद्युत खांब व सदर खांबावरील तार ही खाली वाकलेली असल्यामुळे ये-जा करणाऱ्या मोठ्या गाड्यांना लागत आहे. भविष्यात खूप मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे वारंवार महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला व अधिकाऱ्याला याबाबतची माहिती देऊन सुद्धा अजून पर्यंत सदर विद्दुत खांब व तारांची दुरुस्ती करण्यात आली नाही. सदर परिसरातील विद्दुत समस्याना नेहमीच महावितरण कार्यालयाकडून केराची टोपली दाखविली असून परिसरात वारंवार विद्दुत प्रवाह खंडीत होणे, व्होल्टेज कमी असणे अशा अनेक समस्या असून यापूर्वी अनेकदा समस्याचे निवेदन देण्यात आले परंतू त्यांची दखल घेण्यात आली नसल्याने ग्रां. पं. उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा स्थानिक कर्मचारी यांच्या मार्फतीने महावितरण कार्यालयाला निवेदनातुन दिला आहे.
गावातील युवकांसह सर्व गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की जर पाच दिवसांमध्ये समस्याच निराकरण करून दुरुस्ती न केल्यास कार्यलयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिलेला आहे. सदर प्रसंगी उमेश मोहूर्ले, रोहित मोहूर्ले, विकास शेंडे, मोरेश्वर कोटरंगे, संजय शेंडे, व गावातील बहुसंख्य युवक उपस्थित होते.