मुंबई : वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुका येथील शेकडो शिवसैनिकांचे शपथपत्र घेऊन, उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरक, तालुका प्रमुख विलासराव सुरडकर, कारंजा शिवसेना शहर प्रमुख गणेशराव बाबरे हे गुरुवार दि ०४-o८-२०२२ रोजी मुंबई येथील मातोश्रीवर दाखल झाले असता त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचेशी औपचारिक बैठक पार पडली. यावेळी वाशिम जिल्ह्यातील निष्ठावंताचा पाठींबा बघून शिवसेना प्रमुख यांनी सांगीतले की, "आजपर्यंत अनेकदा विरोधकाकडून शिवसेना फोडण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले परंतु वाशिम जिल्ह्याचा शिवसैनिक कधीही बंडखोरीला बळी पडला नाही. असे कितीही बंड होऊ द्या ती थोपविण्याची ताकद माझ्यात आणि सामान्य शिवसैनिकात आहे आपण पुन्हा नव्या जोमाने उभे राहू आणि आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा पुन्हा जोमाने फडकवू." यावेळी गणेशराव बाबरे यांचे सोबत, उप जि प्रमुख दत्ता पाटील तुरक, तालुका प्रमुख विलासराव सुरडकर, उपशहरप्रमुख अतुल दरेकर, सरपंच शाखाप्रमुख दिपक उगले, उपशाखाप्रमुख विजय बंड, गटप्रमुख रवी घाटे, सचिन भुजाडे व अनेक शिवसैनिक कारंजा तालुक्यातून हजर होते. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुखांनी, कारंजा नगर पालिकेत शिवसेनेचा भगवा फडकविण्याबाबत गणेशराव बाबरे यांना आदेश दिले असून, प्रत्येक वार्ड प्रभागातून शिवसेना उमेद्वारांना उमेद्वारी देण्याच्या दृष्टिने आपण कारंजा येथे पोहोचताच वार्डनिहाय बैठकीचे आयोजन करू असे सुचक आश्वासन बाबरे यांनी पक्ष प्रमुखांना दिल्याचे वृत्त त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे मातोश्रीवरून, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिले आहे .