वाशिम : शेतकऱ्यांच्या समस्यांना वेळोवेळी आपल्या लिखाणातून दैनिकाद्वारे वाचा फोडणारे युवा पत्रकार निलेश सोमाणी यांना महाराष्ट्र शासनाचा "शेतकरी पुरस्कार" मिळाल्याबद्दल कारंजा येथील ज्ञानगंगा साहित्य मंडळ आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून दि .०२/०६/२०२२ रोजी, श्री शिवाजी कॉलेज सभागृह वाशिम येथे अमरावती विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार - अॅड . किरणराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते तसेच, ज्ञानगंगाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय कडोळे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे लोमेश पाटील चौधरी यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन, शेतकरी पुरस्कार प्राप्त युवा पत्रकार निलेश सोमाणी यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी खेर्डा जिरापुरेचे मा सरपंच प्रदिप वानखडे, ज्येष्ठ किर्तनकार श्रीकृष्ण पाटील राऊत, रामेश्वर पचांगे गुरुजी, दशरथ खडसे गुरुजी, पत्रकार संजीव भांदुर्गे आदी उपस्थित होते . याप्रसंगी निलेश सोमाणी यांच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देतांना आमदार किरणराव सरनाईक यांनी जिल्ह्यातील साहित्य व कला क्षेत्रातील नामांकित असणाऱ्या विदर्भ लोककलावंत संघटना व ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजाच्या भरीव कामगीरी बद्दल पत्रकार संजय कडोळे यांच्या कुशल कार्याची सुद्धा दखल घेत कौतुक केले . लोमेश पाटील चौधरी यांनी आभार मानले .