कारंजा येथील एलगार समितीचे सदस्य सचीन एकनार यांचा मुलगा चि. मीत सचिन एकनार यास राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्याचा दिनांक १७.०१.२०२५ रोजी शेतकरी एल्गार समिती वाशिम जिल्हाचे वतीने कारंजा येथे सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. पंकज पाटील काटोले (एम एस ऑर्थो) यांच्या अध्यक्षते खाली शेतकरी ऐलगार समितीचे कार्यालयांत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. पंकज काटाले हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन चि. मित याचा व त्याचे वडील श्री सचिन एकनार यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन ङसत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमास राजू अवताडे, अध्यक्ष शेतकरी एलगार समिती कार्याध्यक्ष डॉ. रमेश चंदनशिव, मार्गदर्शक गजाननराव अमदाबादकर,कौषाध्यक्ष दिलीप पाटील रोकडे, उपाध्यक्ष सागर पाटील दुर्गे, सचिन खांडेकर, अजय पाटील रंगे, किरण पाटील ठाकरे, मुशर्रफ शेख, किसनराव अवताडे, वसंतराव राऊत, रवींद्र रोहनकर ,सतीश पाटील दुर्गे व सर्व शेतकरी एलगार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राजुभाउ अवताडे यांन आपल्या भाषणातुन मित याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ पंकज काटोले यांनी सुद्धा चि. मित व वडील सचिन एकनार यांना शाल श्रीफळ व भेट वस्तु देउन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचीन खांडेकर यांनी केले तर संचलन सागर दुर्गे यांनी व आभार दिलीप पाटील रोकडे यांनी मानले