आरमोरी :- मागील काही काळापासून वन्यजीव मानव संघर्ष सातत्याने वाढत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग सदैव प्रयत्नशील आहे. मात्र याकरिता सर्वसामान्य नागरिकांचेही तेवढेच सहकार्य महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी केले.
दि.06 ऑक्टोबर 2023 रोजी वनपरिक्षेत्र आरमोरी यांच्यावतीने दि .01 ऑक्टोंबर ते 07 ऑक्टोंबर "वन्यजीव सप्ताह" निमित्ताने हितकारणी महाविद्यालय ,आरमोरी येथे वन्यजीवांविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.डाॅ.रामकृष्ण मडावी माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र , श्री.अविनाश मेश्राम,वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी, श्री मा.जे एस फुलझेले ,प्राचार्य हितकारीणी उच्च विद्यालय आरमोरी, सौ.तिजारे,सौ.मेश्राम, श्री.रामदासजी दहीकर, श्री आर.पी. कुंभारे क्षेत्र सहाय्यक आरमोरी, श्री फुलझेले वनपाल,श्री.अजय उरकुडे वनरक्षक रवी, श्री.पी आर पाटील ,वनरक्षक आरमोरी , श्री.अतकरी वनरक्षक जोगीसाखरा ,श्री.आनंद साखरे, वनरक्षक रामाळा ,कु.नलीनी भर्रे वनरक्षक,कु .सहारे वनरक्षक,प्रा. कु.शेंन्डे व वनमजूर , शालेय विद्यार्थ्यी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मा.श्री.पवनकुमार जोंग (भावसे )परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी मा.श्री. अविनाश मेश्राम , वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला मा.डाॅ.रामकृष्ण मडावी माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र , श्री.अविनाश मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी, श्री मा.जे एस फुलझेले ,प्राचार्य हितकारीणी महाविद्यालय, आरमोरी , सौ.तिजारे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वन्यजींवाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आनंद साखरे वनरक्षक रामाळा यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.पी.आर.पाटील वनरक्षक आरमोरी यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....