नाशिक:-
वणीेे येथे जगदंबा मातेच्या नवसपूर्ती करुन छोटा हत्ती वाहनातून घरी परतणारे भाविकांचा टेम्पो वणी - नाशिक रस्त्यावरील फॉरेस्ट डेपो समोर पलटी झाल्याने टेम्पोतील १७ भाविक जखमी झाले.
दिंडोरी तालुक्यातील वलखेड काही भाविक वणी येथे नवस फेडण्या साठी आले होते. तो कार्यक्रम आटोपून घरी परतत असतांना हा अपघात झाला यात जखमी झाले. यात दगू यशवंत गायकवाड वय 70, तनुजा काशिनाथ गायकवाड 17, कमल चंदू चव्हाण 50, यमुना अंबादास धुळे वय ५०, सोमनाथ काळू बोंबले 30,
बाळू जगन जाधव 35, निकिता नामदेव तुंगार 17, मंदा रामदास गायकवाड वय ५० सरिव रा. वलखेड, ता. दिंडोरी, आकांक्षा भीमराव चव्हाण 21, वंदना भीमराव चव्हाण 36, आशाबाई देविदास वागले 48, अनिता सोमनाथ वासळे ४०, रा. करंजवण, दीक्षा रामदास लिलके 14 व साक्षी नामदेव तुंगार 16, रा. कोचरगाव, दीक्षा अशोक वटाणे 12 दह्याची वाडी, योगेश काशिनाथ सरोदे रा. ३६ तळेगाव हे जखमी झाले.
या सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती कळताच वणी ग्रामपंचायत सदस्य विजय बर्डे त्यांचे सहकारी घटनास्थळी जात जखमीस वणी ग्रामीण रुग्णालयात आणले.
तसेच वणी पोलीस ही तातडीने अपघात स्थळावर पोहचले अपघाता मुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती ती सुरळीत करण्यात आली. दरम्यान निकीता टाेगांरे, दगु गायकवाड, यमुना धुळे यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाकी किरकोळ जखमींवर उपचार करुन घरी सोडण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....