चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील कॅफे मद्रास या हॉटेलला आज सोमवारी (18एप्रिल) ला सकाळी 9 वाजताचे सुमारास भिषण आग लागली. वत्त लिहिर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले असून शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील कॅफे मद्रास या हॉटेलला आज सोमवारी (18एप्रिल) ला सकाळी 9 वाजताचे सुमारास भिषण आग लागली. सर्वप्रथम धूर बाहेर पडताना दिसून आल्याने आगीची माहिती झाली. आग एवढी भिषण होती की अवघ्या काही वेळातच आतली आग बाहेर येऊन तिव्र रूप धारण केले.
या हॉटेलच्या बाजूलाच लोकमान्य टिळक शाळा आहे. मात्र सुदैवाने अजूनपर्यंत आग तिथपर्यंत सुदैवाने पोहोचली नाही. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले आहे. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आग शॉर्ट सर्किट ने लागली की अति उष्णतेमुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.!