कारंजा [लाड] :पोस्टे कारंजा शहर येथे दि.07/02/2023 रोजी फिर्यादी शांतीलाल यूनिलाल रूनवाल वय 75 वर्षे रा.मानकनगर कारंजा[लाड]यांनी पोस्टेला जबानी रिपोर्ट दिली की, दि 07/02/2023 रोजी दुपारी 12 :00 वा दरम्यान कृषीउत्पन्न बाजार समिती, बाजापेठ आवार,कारंजा येथुन फिर्यादीचे स्कुटीचे डीक्कीतून काढून, नगदी 8,00,000/- रु दोन अज्ञात इसमांनी चोरुन नेले वरुन पोस्टे कारंजा शहर येथे अप नं. 72/2023 कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासत घेतला.
सदर गुन्ह्याचे तपास मा.पोलीस अधिक्षक बच्चनसिंह साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे साहेब उपविभाग कारंजा व पो.नि.आधारसिंग सोनोनेसाहेब पोस्टे कारंजा शहर यांचे मार्गदर्शनात पोस्टे कारंजा शहर येथील तपासपथक पोउपनि बि.सी.रेघीवाले,पोलीस नाईक उमेशकुमार बिबेकर,पो काँ नितिन पाटील,अमित भगत, गजानन शिंदे यांनी सि.सी.टी.व्ही फुटेज तसेच आरोपीची गुन्हा करण्याची पध्दतीचे आधारे सदर आरोपींचा शोध घेवुन, बुलढाणा येथून आरोपी नामे 1) अजयकुमार अशोकभाई तमांचे वय 42 वर्ष, 2) जिग्नेशभाई उर्फ जुगनु दिनेशभाई घासी वय 44 वर्ष 3) रितीक प्रविण बाटुंगे वय 23 वर्ष, 4) रविभाई नारंगभाई गारंगे वय 55 वर्ष 5) राजेश देवजी तमांचे वय 49 वर्ष, 6) मुन्नाभाई मेहरुभाई इंदरेकर वय 60 वर्ष,7) सनीभाई सुरेंद्रभाई तमांचे वय 35 वर्ष, 8) दिपकभाई धिरुभाई बजरंगे वय 40 वर्ष, 9) मयूरभाई दिनेशभाई बजरंगे वय 39 वर्ष, सर्व रा. कुबेरनगर अहमदाबाद (गुजरात) यांना ताब्यात घेवुन प्रत्येकाची वेगवेगळी सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना मा.न्यायालयासमोर हजर करुण त्यांचा पि.सी.आर. घेवुन त्यांचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात येत आहे.