मनुष्य जन्माला आल्यानंतर जीवनात, दिव्याच्या वाती प्रमाणे आणि चंद्राच्या कले प्रमाणे हळूहळू त्याचेवर पडणाऱ्या संस्कारांनी, स्वतःचे चारित्र्य घडवून घेत असतो. कुंभार ज्याप्रमाणे ओल्या मातीच्या गोळ्याला थापटून थोपटून किंवा प्रसंगी पायी तुडवून जसा मातीच्या गोळ्याला आकार देत मुर्ती किंवा भांडी बनवितो अगदी तशाच प्रकारे,आई वडील, मित्रमंडळी कुटूंब आणि समाज त्याचेवर जसे संस्कार टाकेल तो ते स्वतःच्या जीवनात अंगीकारत असतो. माणसाने जीवनाचे हे मर्म लक्षात घेतले पाहिजे आणि स्वजीवन सार्थ करून घेतले पाहीजे तर अशा प्रकारे माणसाने सर्वांशी प्रेमाने वागून सेवाभावी आणि परोपकारी वृत्तीचा जर अंगीकार केला . तर त्या मनुष्याला आयुष्यभर समाज आदराचेच स्थान देतो . नव्हे नव्हे अशा माणसाला देवाचे देवत्व प्राप्त होत असते . एकमेकांचा राग, ईर्ष्यां, बदनामी, जळतोडेपणा करणारा मनुष्य मात्र स्वतःची हानी करून घेत असतो. स्व -अहंकार आणि आपल्याच माणसाचा राग, ईर्ष्या, मत्सर, द्वेष, चुगलखोरी आणि सज्जनांच्या मिथ्या बदनामीमुळे, लंकापती रावणासारखा चक्रवर्ती राजा, कंसासारखा, दुर्योधन आणि कौरवा सारख्या शंभर लोकांची टोळी अखेर उध्वस्त झाली. कैकयी सारखी महाराणी आणि मंथरा सारखी त्यांची मैत्रीण एकमेकांच्या चुगल्या व कुकृत्याने वाईट पात्र म्हणून समाजाच्या उपेक्षेचे कारण बनल्यात . परंतु सुदामा सारखा फाटका पण अंतःकरणाने निःस्वार्थ असा होता .त्यामुळेच त्याला न मागता सर्व राजवैभव मिळालं. परंतु या उलट स्वार्थी, अहंकारी व्यक्ती मात्र, एकमेकांचा राग द्वेष करीत एकदिवस अन्नानाला मोहताज होऊन स्वतःचे वैभव गमवून बसल्यात . तेव्हा प्रत्येक व्यक्तिने आईवडील दैवत समजून, त्यांनी दिलेले सु संस्कार हेच त्यांच्या कडून मिळालेले तुमच्या जीवनाचे सार समजून मरेपर्यंत स्वस्मरणात कायम राखले तर तुमचे अख्खे धन्य होऊन समाजात तुम्ही पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाल . असे आपल्या, गोंधळ जागरण समाज प्रबोधन कार्यक्रमामधून हभप संजय महाराज कडोळे यांनी आवाहन केले आहे . आपल्या कार्यक्रमातून बोलतांना ते पुढे म्हणाले लोकं केवळ दारू, जुगार, मटका, पान . बिडी गुटखा तंबाकूला व्यसन संबोधून केवळ त्याच्या आहारी जाणाऱ्या स्वभावाला व्यसनाधिनता करतात . परंतु मी म्हणेल याविशाय सुद्धा काही दुर्व्यसनांच्या आहारी गेलेले अनेक पांढरपेशे समाजात वावरत आहेत . ज्यांना पांडवकालिन शकुनी मामा, रामायण कालिन मंथरा दासी प्रमाणे चुगल्या ( टिका टिप्पणी ) करणे, सज्जनांची भरली घरे उध्वस्त करणे . आपल्यापेक्षा पुढे जाऊन नावलौकिक मिळविणार्याचा राग, द्वेष, लोभ, मत्सर करणे आणि विनाकारण कुणाशी एकतर्फी स्पर्धा करून, जळतोडपणा करीत असतात . हे सुद्धा माणसाला लागलेले भयानक वाईट दुर्व्यसन असून, त्याने वेळीच जर अशा दुर्व्यसनाला दूर ठेवले नाही तर मात्र शेवटी त्याचा अंत रावण - कंस शकुनी मामा प्रमाणे होऊन अधोगती मृत्युला पावत असतो . तेव्हा माणसाने सर्वांशी मिळून मिसळून, प्रेमाने, आपुलकी व जिव्हाळ्याने राहीले पाहीजे . विश्वासाने जग जिंकले पाहीजे असे भावनिक आवाहन सुद्धा, जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संच कारंजाचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत हभप संजय महाराज कडोळे यांनी श्री गजानन महाराज मंदिर ममतानगर, येथील, गोंधळ जागरण कार्यक्रमातून केले आहे . यावेळी कार्यक्रमाच्या साथसंगतीला गोपाल मुदगल, कमलेश कडोळे इत्यादी हजर होते . यावेळी ऐकणार्यांची शेकडोच्या संखेत गर्दी होती .