आरोग्य विभागाच्या दाफतरी कोपेला येथील प्राथमिक आरोग्य पथक पण अस्तित्वात शून्य .अनेक आरोग्य कर्मचार्यांची या आरोग्य पथकात नेमनूक झाली यातील काही कर्मचारी कोपेला गाव सुध्दा पाहीले नाही
सिरोचा :- पासुन 49 कि.मी अंतरावर असलेले कोपेला येथील प्राथमिक आरोग्य पथक किष्टय्यापल्ली येथे स्थनांतरित करावे अशी मागणी लोका कङून जोर धरत आहे .राष्ट्रीय महामार्ग क्र 63 च्या बांधकाम च्या अगोदर कोपेला या गावात रहदारी ,येण जाणे कोपेला या गावा मधुन जाणा-या रस्त्यावरून सुरू होते .परंतु राष्ट्रीय महामार्ग क्र 63 हे बांधकाम सरळ सोमनपल्ली वरून झाले. कोपेला या गावाचे महत्व कमी झाले आणि कोपेला पासुन छत्तीसगड ला जाणारा रस्ता पूर्ण पणे बंद झालेला आहे .कोपेला येथील प्राथमिक आरोग्य पथक येथील वन विकास महामंङळ चे कामे जेव्हा पासुन बंद झाले आणि येथे वास्तव्य करणारे मजूर कुटुंबा सह कोपेला गाव सोडले.तेव्हा पासुन हे आरोग्य पथक कुचकामी झालेले आहे .लोकसंख्या पण कमी झाली.ङाॅ.रोहरा हे येथे राहून आरोग्य सेवा देणारे शेवट चे वैद्यकीय अधिकारी ठरले. या भागातील गावाना जाण्या येण्यासाठी पक्के रस्ते नाही आणि नाल्या मुळे यातायात अवरूध्द होते म्हणून कोपेला येथील सध्या असलेले आरोग्य पथक किष्टय्यापल्ली येथे स्थानंतर केल्याने या भागातील लोकांना गरोदर मातांना योग्य सुविधा होईल *या भागात पावसाळ्यात अंबुलन्स सुध्दा येवु शकत नाही* अशी अवस्था असलेला गावांना योग्य आरोग्य सुविधा चा लाभ होईल .कोर्ला, कोपेला , पुल्लीगुङम , रमेशगुङम , व कर्जेली या गावांच्या लोकांना आरोग्य सेवेच्या फायदा होईल .सध्या हे गाव आरोग्य सेवे पासुन उपेक्षित आहे.किष्टय्यापल्ली हे गाव मधोमध असल्यामुळे आजु बाजु च्या गावातील लोकांना फायदा होईल.काही वर्षा अगोदर चिंचा च्या झाडांच्या बाजु ची जागा सुध्दा उपलब्ध करण्यात आली परंतु नंतर कोणतीही प्रगती झाली नाही असे या भागातील गावकर्यांचे म्हणने आहे.