महात्मा फुले सोसायटी, वाघापूर रोड, यवतमाळ येथील रहिवासी श्री पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर (श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक) यांचे घरी वातावरणाला शोभेल असे पर्यावरणपूरक गणपतीचे विसर्जन परिवाराकडून करण्यात आले. ते दरवर्षी मातीच्या गणपतीची आॕर्डर देतात व घरीच विसर्जन करीत असतात.
मोठ्या थाटामाटात १० दिवस गणपती बाप्पाची आरती, पूजा झाली. आज अनंत चतुदर्शी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे गणेशाला निरोप देण्यासाठी भाविक शहरातील नदीच्या घाटावर, नाले, ओढे, तलाव यावर गर्दी करतात. यामुळे नदी, नाले, तलाव व पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. जर घरच्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती विसर्जन केले तर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात प्रदूषण, हानी टाळता येईल. एका मोठ्या बकेट, टोपले, गणपती पाण्यात पूर्णपणे डूबेल एवढे भांडे घेऊन त्यात पाणी घ्यावे. त्यात अमोनियम बाय कार्बोनेट मिक्स करावे, त्यामुळे मूर्तीचे काही तासात विघटन होते. हे जरी शक्य नसेल तर नुसते पाणी घेतले तरी चालेल. गणपतीची मूर्ती ही मातीची असावी. मूर्ती प्लॕस्टर आॕफ परिसची नसावी कारण ती मूर्ती पाण्यात मुरत नाही. मूर्ती घेतांनाच मातीची असेल तर घ्यावी.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे महत्त्व आजच्या बदलत्या काळात आणि परिस्थितीतही टिकून आहे. श्री गणराय म्हणजे ज्ञान आणि बुद्धीची देवता. ह्या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव हा जगातील मोठा सामाजिक उत्सव बनला आहे. प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पा बसविला जातो. प्रत्येकांनी घरोघरीचं गणपती बाप्पाची पर्यावरणपूरक विसर्जन करावे आणि पर्यवरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. कृपया जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते, हे प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे. प्रत्येक शहरात गणपती विसर्जनासाठी एक मोठा हौद बनवून त्यात पाणी भरुन त्या हौदात सर्व गणपतीचे विसर्जन व्हावे. म्हणजे पर्यावरणाला हानी पोहचणार नाही. सर्वांनी पर्यावरणपूरक गणपतीचे विसर्जन करावे.