वरोरा : खांबाडा परिसरातील कोसरसर रोडवर अवैध देशी दारूची तस्करी करणारे दोन आरोपी व सुझुकी सुपर कॅरी मालवाहू MH 34 BG 6772 या वाहनातून अवैध देशी दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती च्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपनी वरोरा परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक योगेश रांझणकर, नोपाणी यांनी 17 जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोसरसार रोडवर खांबाडा परिसरात एक वाहन पकडले. , यामध्ये रॉकेट ऑरेंज देशी दारू 90 एम. सह चारचाकी वाहन असे एकूण अंदाजे किंमत सहा लाख रु चा माल पोलिसांनी जप्त केला,पोलिसांनी
आरोपी 1) अमोल चौधरी, बोथली (शिरपूर) व चिमूर, 2) पवन भोयर, मानोरा (शिंगरू) भद्रावती, यांच्यावर कलम 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींच्या नुसार ही अवैध दारू शेगाव परिसरातील भेंडाळा गावातील हर्षल खंगार याला पोहचविण्यासाठी जात असल्याचे सांगितले.
हा दारू तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती दिली असून, या माहितीच्या आधारे खरा खरेदीदार कोण आहे याचीही माहिती घेतली जाणार असल्याचे परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक योगेश रां जणकर यांनी दिली.या कारवाईनंतर दारूबंदी विभागाने अवैध दारू तस्करीबाबत जागरुक राहण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.