हरदोली गावालगत असलेल्या वैनगंगा नदी काठावर एका पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदर मुलगी ही कुरखेडा तालुक्यातील असुन मुलीची हत्या करून पाण्याच्या टाकी मध्ये शव ठेवल्याचे निदर्शनास आले. सदर हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी हे देसाईगंज येथील असुन एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
मृतकाच्या मोबाईल ट्रेस वरून आरोपी मिळाल्याची सुत्रांची माहिती आहे. सदर मृतदेहाला ब्रम्हपुरी पोलिसांनी उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले आहे.