अकोला महानगरपालिका आयुक्त कविता व्दिवेदी यांची चौकशी करून यांची अकोला महानगरपालिका आयुक्त पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तर नगर विकास मंत्रालय विभाग यांना निवेदन देऊन केली आहे
अकोला मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांच्या आदेशावरून मनपाचे पूर्व झोन कार्यालयाचे अधिकारी यांनी न्यू तापडिया नगरातील अवैद्य बांधकाम केलेल्या नागरिकांच्या पुढील कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केला आहे,
मनपा आयुक्तांनी अकोला शहराच्या विकासाच्या नावाखाली या शहराचा भकास असा विकास केला आहे शहरांमध्ये सर्वत्र भागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे तर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अकोला मनपाच्या शाळा दवाखाने ओसाड सापडले तर शहराच्या अनेक भागांमध्ये सिमेंट रस्ते करण्यात आले या रस्त्यावर तात्काळ मोठमोठे खड्डे पडले असून याचा नागरिकांना त्रास होत आहे तेव्हा असे लक्षात येते की सिमेंट रस्त्यामध्ये ही आयुक्तांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी असेही दिलेल्या निवेदनात पंडीत भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे
मनपा आयुक्त यांची चौकशी करून त्यांना अकोला मनपाच्या आयुक्तपदावरून हकाल पट्टी करावी अन्यथा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात बहुजन जनता दल राज्यस्तरीय आंदोलन करणार असा इशारा बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि नगर विकास मंत्रालय यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे