ब्रम्हपूरी तालुक्यातील निलज येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्गखोलीच्या इमारतीचे लोकार्पण नुकतेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
निलज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 150हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र संख्येच्या प्रमाणात सुव्यवस्थित स्थितीत वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. यासंदर्भात निलज येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी सदरची समस्या तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद चिमुरकर यांना सांगितली. तेव्हा चिमुरकर यांनी प्रयत्न करून दोन वर्गखोल्या मंजूर करून दिल्या. सदर दोन्ही वर्गखोल्यांचे बांधकाम पुर्ण झाले असुन लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे.
यावेळी सरपंच हेमंत ठाकरे, उपसरपंच शंकर कोपुलवार, पत्रकार राहुल मैंद, शाळा व्यवस्थापन माजी अध्यक्ष अशोक भुते, व्यवस्थापन समिती अध्यक्ष धर्मपाल राहाटे, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका वैजयंती वाळके, ग्रामसेवक प्रदीप तलमले, ग्रा.पं.सदस्य नारायण मेश्राम, ग्रा.पं.सदस्य मनोहर राहाटे, ग्रा.पं.सदस्या प्रिया ढोरे, अंगणवाडी सेविका शशिकला बुर्रेवार, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दादाजी भर्रे, गुरूदेव सोंदरकर, श्रीकांत ढोरे, प्रल्हाद ढोरे, प्रल्हाद नारनवरे, भोपाल बाकमवार, विकास ढोरे यांसह गावातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.