नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत ढोरपा येथील एका इसमाने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल ४ वाजता उघडकीस आली. दिनराज जगन सोकार (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.दिनराजने काल सकाळी पत्नीसोबत जेवण केले. त्यानंतर पत्नीला मौशी येथे मिरची सात्राच्या कामावर सोडले. काही वेळाने तो घरी आला. त्यानंतर शेतातील पारीवरील तुरीचे फनकट काढण्यासाठी गेला. शेतावर इतर शेजारी शेतकरी होते. दरम्यान कडक उन्हामुळे इतर शेतकरी १२ वाजता घरी आले, परंतु तो तिथेच काम करतोय म्हणून थांबला. दरम्यान पुन्हा सायंकाळी त्याच्या परिवारातील इतर शेजारी शेतकरी सायंकाळ चा पारोग म्हणून शेतावर काम करण्यासाठी गेला असता दिनराज शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी लगेच ही माहिती गावात दिली. पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. सदरमृतकाला पत्नी मुलगी व मुलगा आहे.