ब्रम्हपुरी:- दि.९ऑक्टोंबर २०२२ रोज रविवारला कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून BTCA ब्रम्हपुरी च्या वतीने "स्व.वामनरावजी बाळबुधे सर स्मृती ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा " चे भव्य आयोजन डॉ.आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथे करण्यात आले. स्पर्धेत एकूण १२१ खेळाडूनी भाग घेतला.स्पर्धेचे प्रायोजक श्रीमती सुषमाताई वामनराव बाळबुधे मॅडम ब्रम्हपुरी तर्फे एकुण ४२०००रूपयाचे बक्षीस होते.स्पर्धेचे उद्घाटन १०.०० वाजता BTCA चे मार्गदर्शक श्री हरीश्चन्द्रजी चोले व प्रा.सुयोग बाळबुधे उपाध्यक्ष BTCA ब्रम्हपुरी यांच्या बुद्धीबळाच्या प्रदर्शनीय सामन्याने करण्यात आले.
दोन गटातील सात फेऱ्या पुर्ण करुन ५.००वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.ओपन गटात-सरल सोनवाने प्रथम , शिवम कुलमलकर द्वितीय व विवेक रामटेके तृतीय तसेच बेस्ट ब्रम्हपुरी खेळाडूंमध्ये मुकुल सयाम प्रथम,रीतेश कामडी द्वितीय व रजत कामडी तृतीय येवुन यशाचे मानकरी ठरले.१५वर्षांखालील खेळाडू गटात-सार्थ बुजाडे प्रथम, सक्षम छेडे द्वितीय व ओजस राहुल भोयर तृतीय तसेच बेस्ट ब्रम्हपुरी खेळाडूंमध्ये यश घनश्याम चौधरी प्रथम, प्रसाद धकाते द्वीतीय व शिवम क्षिरसागर तृतीय अश्या प्रकारे विजयाचे मानकरी ठरले.
प्रत्येक गटात १५-१५ पुरस्कार व ५-५ प्रोत्साहन असे एकूण ५४ पुरस्कार ,ट्राफी व प्रमाणपत्र देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्ष डॉ.खिजेंन्द्र गेडाम ब्रम्हपुरी हॉस्पिटल , बक्षीस वितरक श्रीमती सुषमताई बाळबुधे मॅडम स्पर्धा प्रायोजक,तथा प्रा.सुयोग बाळबुधे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलेत व प्रमुख अतिथी मा.श्री.हनवते सर ,मा.श्री.हरीश्चंद्र चोले, श्री महादेवराव दर्वे,मा.प्राचार्य.सतीश शिनखेडे , श्री. शंकररावजी नाकतोडे यांच्या सहकार्याने बक्षिसे वितरण केलेत.
श्री.प्रवीण पाणतावने (I.A) मुख्य ऑर्बिटर, श्री .श्रीकांत सर सहाय्यक ऑर्बिटर व नीलेश बांडे यांनी योग्य नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली.
प्रास्ताविक श्री.दशरथ बांडे अध्यक्ष BTCA यांनी केले तर श्री.मुनीराज कुथे यांनी संचलन व प्रा.मोतीलाल दर्वे यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. रीतेश उरकुडे, जुबेर रय्यानी,वेदांत बांडे, प्रा.शाम शेटीये व BTCA चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे उपस्थितीत स्पर्धेची सांगता करण्यात आली.