कारंजा नगरीतील भव्य दिव्य लोकप्रियता प्राप्त व्यक्तीमत्व, विकसीत कारंजा नगरीचे शिल्यकार माजी आमदार लोकनेता स्व. प्रकाश दादा डहाके यांचा जयंती उत्सव दि. १९ ऑगष्ट रोजी विवीध लोकोपयोगी कार्यक्रमाने साजरा झाला .
या निमित्ताने,सकाळी ऋषी तलाव परीसर व स्व.प्रकाशदादा डहाके वन पर्यटन केंद्रात, वृक्षारोपनानंतर गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मतीमंद विद्यालयात अन्नसेवा व वृद्धाश्रमातील अन्नसेवा कार्यक्रमानंतर दत्त कॉलनीस्थीत शक्तीस्थळ पंचवटी हनुमान मंदीर सभागृहात, स्व.दादांच्या प्रतीमा पुजन व अभिवादनाचा कार्यक्रम प्रा सुधीर लूंगे यांचे पुढाकारात प्रकाश दादा मित्रमंडळाचे सहयोगातून घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कारंजा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष दत्तराजजी डहाके उपस्थीत होते. कार्यक्रमाला आमदार श्रीमती सईताई डहाके; नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष संजयजी काकडे; निशा गोलेच्छा ;तेजस्वीनी डहाके; प्राजक्त माहीतकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थीती होती . "तोरा मन दर्पन कहलाये" या दादांच्या आवडत्या भजनाने श्री गजानन महाराज भजनी मंडळ महावीर कॉलनी यांनी वातावरण धिरगंभीर केले . दादांच्या कार्याबाबत मोडक सर यांनी प्रकाश टाकला.तर दादाचे शक्तीस्थळावर नित्याने येणे सवंगड्याशी हितगुज करणे. त्यांना आवडीचे वाटत होते.असे प्रास्ताविकातून प्रा.सुधीर लूंगे यांनी सांगीतले. बाबूराव देशमुख यांनी दादाविषयी आपले अनुभव कथन केले . दादा उच्च विद्याविभूषीत होते.अनेकांशी त्यांचा संपर्क आला.त्या संपर्कातून डहाके परीवारावर प्रेम करणारा समाज पुढे आला. असेच भरभरून आशीर्वाद रुपी प्रेम चाहत्यांचे सदोदीस राहो. अशी शुभ भावना अध्यक्षीय भाषणातून दत्तराजजी डहाके यांनी व्यक्त केली .उपस्थीतांना चहा पाणी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला दत्त कॉलनी महाविर कॉलनी; इश्वर कॉलनी नगरपरिषद यशवंत कॉलनी सह कारंजातील दादा प्रेमीनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थीती दिली. असे वृत्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दादा समर्थक आणि करंजमहात्म्य परिवाराचे सर्वेसर्वा जेष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.