मॉर्निंग वॉक करत असलेल्या इसमाला पाणी घेऊन जाणाऱ्या टेम्पोने उडविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी चंद्रपुर-घुग्घुस मार्गावरील शांतीनगर जवळील डिके ढाब्याजवळ घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीवर चंद्रपुरात उपचार केल्यानंतर नागपूरात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान हसन ईस्तेखार अहमद याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी आकाश भगत याला घुग्घुस पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळच्या सुमारास तीन जण चंद्रपुर-घुग्घुस मार्गावर मॉर्निंग वॉक करत होते. अशातच विरुद्ध दिशेने पाणी घेऊन येणाऱ्या टेम्पो ने हसन अहमद याला जोरदार धडक
दिली. यात हसन याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर चंद्रपुरातउपचार करून पुढील उपचारासाठी नागपुरात हलविले, मात्र हसन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी
दाखल होऊन पंचनामा केला व टाटा एस मॅजिक वाहनला, ताब्यात घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. ही करवाई पोलिस निरीक्षक आसिफराजा बी. शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.