कारंजा(लाड) : उस्ताद विर लहुजी साळवे यांच्या २२८ व्या जयंतित्सवानिमित्त, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि उस्ताद विर लहूजी साळवे मित्र मंडळ, मंगरुळवेश, कारंजा यांच्या वतीने, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांच्या अध्यक्षते खाली, माजी सरपंच प्रदिप वानखडे, प्रमुख पाहूणे गावाकडची बातमीचे युवा पत्रकार दामोदर जोंधळेकर, अभा नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांच्या उपस्थितीत, उस्ताद विर लहूजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले यावेळी प्रामुख्याने विठ्ठल लोंढे, साळवे, तुकाराम लोंढे आदिंची उपस्थिती होती .