कारंजा : श्री गुरुमाउलीच्या नगरीत सर्वधर्मियांचे एकमेव श्रध्दास्थान असलेल्या पहिल्या श्री साईबाबा वाटिका मंदिराचे निर्माणाचे पवित्र कार्य हातामध्ये घेऊन दि २७ मार्च रोजी, श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठेद्वारे पूर्णत्वास नेत असलेल्या निष्काम कर्मयोगी साईभक्त किशोर धाकतोड यांच्या महत्प्रयासाने, पंचमुखी हनुमान आश्रम खंबाले - इंदोरे त्र्यंबकेश्वर रोड नाशिक आखाड्याच्या, सिद्ध साध्वी महंत भगवत्दास त्यागी श्री श्री १००८ विजयादेवी यांचे कारंजा येथे आगमन झाले असून सर्वप्रथम त्यांनी श्री साईबाबा वाटिका मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतले. तेथे साईबाबा वाटिका मंदिर समिती अध्यक्ष विश्वस्त संचालक व साईभक्तांकडून त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर निष्काम कर्मयोगी किशोर धाकतोड यांचे निवासस्थानी, धाकतोड परिवारातर्फे किशोर धाकतोड यांनी पाद्यपूजन करून सिद्ध साध्वी श्री श्री १००८ विजयादेवी यांचे स्वागत केले.याप्रसंगी श्रीमद भागवत प्रवक्त्या वृंदावनधामच्या साध्वी चित्रा दिदी, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद सांस्कृतिक विभागाचे कारंजा तालुका प्रमुख संजय कडोळे, अतुल धाकतोड, अ भा मराठी नाट्य परिषदेचे नंदकिशोर कव्हळकर आदींनी साध्वी श्री श्री १००८ विजयादेवीचे दर्शन घेऊन सुसंवाद साधला व दिंदीचे आशिर्वाद घेतले. दि. २७ मार्च पर्यंत श्री साईबाबा वाटिका मंदिर बालाजी नगरी भाग-२ येथे त्यांचा मुक्काम राहणार असून कारंजेकर भाविक भक्त त्यांच्या दर्शनार्थ मोठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे .