: मराठा सेवा संघ गडचिरोलीच्या वतीने जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय गडचिरोली येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव गोविंदराव बानबले होते तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष दादाजी चापले व एसटी विधाते होते
यावेळी कार्यक्रमाचे सुरुवात जिजाऊच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व हार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दादाजी चापले यांनी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या कार्याचा गुणगौरव केला. अध्यक्षपदावरून गोविंदराव बानबले म्हणाले राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले, त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. यावेळी कार्यक्रमाला घनश्याम जक्कुलवार, नरेंद्र पूसदेकर, प्रवीण मशाखेत्री, प्रफुल्ल येलेकर, दादाजी चूधरी,आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार इंजिनियर राजेंद्र उरकुडे यांनी केले.