गुरुदेव भजनी मंडळाच्या तालुका जिल्हा कार्यकारणीच्या
सभेचे भव्य आयोजन, करण्यात आले आहे. रविवार दिनांक 03 ऑगस्ट 2005 रोजी दुपारी 01 : 00 वाजता, श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर मंगरूळपीर येथे,मा. लक्ष्मणराव आवटे,जीवन प्रचारक यांचे अध्यक्षतेखाली व मा.दौलतराव इंगोले तालुका अध्यक्ष, व मा. रविभाऊ वाडेकर मध्यवर्ती प्रतिनिधी गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे, तरी सर्व गुरुदेव सेवा भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने हजर राहावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सभेमध्ये,मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सर्व संत स्मृती महोत्सवास अहवालास विचार मिनीमय करून मान्यता देणे.
जिल्हा कार्यकर्ता मेळावा घेऊन विचार विनिमय करणे.
स्वातंत्र चळवळीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहभागानिमित्त क्रांतीज्योत प्रचार यात्रेचे स्वागत करण्याबाबत विचार विनिमय करणे.मध्यवर्ती प्रतिनिधीचा सत्कार सोहळा घेण्याबाबत विचारविनिमय करणे.जिल्ह्यातील ग्रामगीताचार्य यांच्या उप स्थातीबाबत विचार विनिमय करणे. व सन्माननिय अध्यक्षांच्या वतीने वेळेवर येणारे विषय हाताळणे. आदी मुद्यांवर चर्चा होणार आहे.तरी सर्व गुरुदेव भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाधिकारी सुनिल भाऊ दशमुखे यांनी केल्याचे ज्येष्ठ पत्रकार गुरुभक्त संजय कडोळे यांनी केले आहे.