तालुक्यातील सुरबोडी जवळ चिंचोलीकडे पाणी वाहून जाण्याकरीता रेल्वे लाईन च्या बाजूने नवीन कालव्याचे बांधकाम झालेले आहे, त्यामध्ये पुलाची तरतूद न करता फक्त छोटे २ भोंगे (पाईप) टाकलेले आहेत. या परीसरात ६ ते ७ किलोमिटर वरून शेतशिवारातील पाणी येत असते. त्यामुळे टाकलेल्या पाईपमधून पाणी न निघता जवळपास २०० ते ३०० हेक्टर शेतशिवारात पाणी साचून राहते व पुर्णता धान पिकाची नुकसान होते.
२०१९ पासून गोसेखुर्दला ग्रामपंचायतच्या पत्राद्वारे त्याचप्रमाणे सुरबोडी येथील शेतकरी बंधूनी स्वतः भेटी घेउन गोसेखुर्द उजवा कालवा उपविभाग क. १४ नागभिड यांना वेळोवेळी सुचना करून सुदधा कामाकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजयभाऊ वडेटटीवार यांनी सुदधा वारंवार सूचना केलेल्या आहेत. सुचना करूनही अजुनपर्यंत या कामास सुरवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे जवळपास २०० ते ३०० हेक्टरमधील दरवर्षाला धानपिकाची नुकसान होत आहे व नुकसानीचे पंचनामे सुदधा करण्यात आलेले आहेत. पण फार थोडक्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येते. परंतू धानपिकाची संपूर्ण फसल जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
त्याच संदर्भांत सुरबोडी येथील शेतकरी बंधूनी ब्रम्हपुरी तहसिलदार यांना निवेदनातून आपली व्यथा मांडली व त्यांना सांगितलं की, आपण गासेखुर्दच्या संबंधित विभागाला सुचना करून ८ दिवसाच्या आत पाणी वाहून जाण्याकरीता सुचना देण्यात याव्या अन्यथा या बाबतीत सुरबोडी येथील शेतकन्यांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल त्याचप्रमाणे पाण्याच्या ओढयामुळे कॅनल तुटल्यास सुरबोडी येथील शेतकरी जवाबदार राहणार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निवेदन देताना यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सुरबोडी ग्रामपंचायतच्या सरपंच रसिका बावनकुळे, माजी सरपंच हिरालाल ठेंगरे माणिक राऊत पांडुरंग ठेंगरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निकेश ठेंगरे, जनार्दन ठेंगरे मनोहर ठेंगरे पटवारी बेदरे डिल्लू बेदरे, पुरुषोत्तम कवा से हमराज कव्वासे विक्रम डोलारे दर्शना ठेंगरे निवेदन देताना उपस्थित होते