सुप्रसिद्ध संस्थान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरु मंदिर येथे श्री च्या जन्मोस्थावं संपन्न होत आहे त्या निमित्य 16 फेब्रुवारी रोजी श्रीराम महिला भजनी मंडळाने आपली भजन सेवा रुजू केली श्रीराम महिला भजनी मंडळानी आपल्या भक्ती संगीत सादरीकरण करून. सर्व भजनी मंडळ सदस्यांनी बहारदार भक्ती गीत भजन गवळण असे अनेक प्रकार सादर केले तसेच शोभाताई पळसोकर यांनी मनोदय व्यक्त करीत पन्नस वर्षाचा लेखा जोखा सर्वभक्तांसमोर मांडला मंडळानी गेली अनेक वर्षापासून सेवा दिली व अनेक पुरस्कार प्राप्त केले असल्याचे सांगितले शोभा पाळसोकर कुमुद नांदेडकर वनिता दिग्रसकर अनुराधा संपळे श्रद्धा श्रीकांत भाके सपना चौधरी पायल तिवारी वृषाली लक्रस अंजली शेटे संध्या गंगातिरकर मैथिली पळसोकर स्मिता धनस्कर शिला चिवरकर पुष्पा देसाई सुलोचना संपळे आशा अलमवार निलीमा मस्के कोकिळा कोळीकर पुष्पा कोळीकर कॉडण्य किन्हीकर रेखा मनोरकर राधिका काशिकर विणा गडीकर अमृता कान्नव शिला देशपांडे विनया येवतेकर पुष्पा देऊळकर राजेश्री त्रिकांडे विणा देशपांडे यांनी भजन सादर केले पेटीची संगत दत्ता कुणचटवार तबला संगत प्रथमेश सस्तकर टाळ वादक गुलाब पापळे इत्यादी कलावांतांनी भजनाला साथ दिली. मंडळाचे वतीने सर्वाचा सत्कार करण्यात आला. असे वृत्त सेवाव्रती कार्यकर्ते हफिजखान यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना दिले आहे .