अकोला : अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद योगीराज परब्रम्ह सदगुरू श्री समर्थ गजानन महाराज यांचे, विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्टेशन असलेले,श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान हे केवळ आणि केवळ आपल्या भक्तमंडळीच नव्हे तर सर्वधर्मिय जनता जनार्दन,वारकरी,विद्यार्थी, रुग्न व दिव्यांगाकरीता आपल्या निष्काम निस्पृह सेवेमुळे अख्ख्या जगभरात सुप्रसिद्ध ठरलेले एकमेव संस्थान आहे. या संस्थान सारखी सुव्यवस्था, स्वच्छता व निटनेटकेपणा,शिस्त व सेवाधारी आणि वारकर्यांची अवर्णनिय निःस्वार्थ सेवावृत्ती जगभरात कोठेही बघायला मिळत नाही आणि ह्या संस्थानसारखे व्यवस्थापन व सुत्रसंचलन प्रत्यक्ष शासनालाही एक दिवस सुद्धा करता येणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. अशा या संस्थानच्या सेवावृत्तीचा, भोजन व्यवस्थेचा व व्यवस्थापनाचा उल्लेख, श्रीशिवमहापुराण प्रवक्ते पंडीत परमपूज्य प्रदिप मिश्राजी आपल्या प्रवचनातून दरदिवशी एकवेळ तरी करीत असल्यामुळे पंडित परमपूज्य प्रदिप मिश्राजी हे देखील श्री संत गजानन महाराजांचे निस्सिम भक्त असल्याचेच त्यांनी सिद्ध केले आहे व त्यामुळे देशविदेशातून आलेल्या शिवभक्तांना श्रीक्षेत्र शेगाव संस्थानची महती कळत आहे.
व पंडित प्रदिप मिश्राजी हे त्यांच्या प्रवचनातून श्री गजानन महाराजांवर उधळीत असलेली स्तुतीसुमने पाहून,संत गजानन महाराज भक्त परिवारामध्ये आनंद व उत्साह ओसंडून वाहत आहे. व श्रीशिवमहापुराण कथा प्रवचना दरम्यान श्री संत गजानन महाराजांचा जयघोष केल्या जात आहे. या संदर्भात, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभाग कारंजा तालुका प्रमुख आणि जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे अध्यक्ष असलेले,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीलेले वृत्त असे की,वर्तमान स्थितीत विविध धार्मिक दूरदर्शन वाहिन्या सोबतच आस्था वहिनीद्वारे, संपूर्ण जगभरातील सनातन हिंदु धर्मियांच्या घराघरात पोहचून,शिवभक्ताचे श्रध्दासागर ठरलेल्या पंडित प्रदिप मिश्राजी यांच्या सुमधूर वाणीमधून, श्रीशिवमहापुराण कथा प्रवचन, सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या अकोला नगरीला लागूनच असलेल्या ग्राम म्हैसपूर शिवारात दि ५ मे २०२३ पासून सुरु आहे. या प्रवचनाचा लाभ घेण्याकरीता अकोला येथे भारतभरातून जवळ जवळ पाच लाख शिवभक्त एकत्र जमले आहेत.
उल्लेखनिय म्हणजे अनाथांचे नाथ पांडूरंगाचा प्रत्यक्ष अवतार म्हणून भाविकामध्ये पूजनिय असलेले ब्रम्हांडनायक संत गजानन महाराजांचे प्रतिपंढरपूर असलेली शेगाव नगरी अकोला येथून जवळच आहे. व अकोला येथे प्रत्येक घरोघरी संत गजानन महाराजांची भाविक भक्त मंडळी आहेत. त्या पार्श्वभूमिवर,पहिल्याच दिवशीच्या प्रवचनातून जेव्हा पंडित प्रदिप मिश्राजी म्हणाले, "दुनियाकी सबसे बडी रसोई, सबसे बडी अन्नशाला, सबसे बडा भंडारा अगर चलता है तो वह श्री गजानन महाराजकी चरणोमे चलता है ।" अर्थात पंडित मिश्राजी यांनी स्वतः मान्य केले की, श्रीक्षेत्र शेगावसारखे सर्वात मोठे स्वयंपाकगृह, सर्वात मोठी भोजनव्यवस्था व सर्वात मोठा सेवाभाव कोठेही नाही. त्यांच्या ह्या वर्णनाने एकाच क्षणात लाखो टाळ्यांच्या गजरात संत गजानन महाराजांचा जयघोष झाला असून त्यानंतर सुद्धा दरदिवशी श्री गजानन महाराजांचा पंडितजी आवर्जून उल्लेख करीतच असल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे.