अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व दिव्यज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्था अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात *दि.१० ते १६ ऑगस्ट २०२३ दरम्यान दिव्यांग बांधवांसाठी राखी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली* . दिव्यांगांना शिक्षणासोबत रोजगार मिळावा या हेतूने सदर कार्यशाळेत दिव्यांग बांधवांनी विविध आकर्षक राख्यांची निर्मिती केली आहे . ह्या राख्या दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे अकोल्याच्या विविध शाळा ,महाविद्यालय व बाजारपेठेत स्टॉल लावून विकल्या जाणार आहेत .*अपेक्षा अपार्टमेंट क्र २ ,फ्लॅट क्रमांक ७ ,गणेश नगर ,लहान उमरी अकोला या संस्थेच्या कार्यालयात आणि शिवाजी महाविद्यालय अकोला चा दिव्यांग कक्षात या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत* .ऑनलाइन पद्धतीने सुद्धा या राख्या भारताच्या विविध शहरात पाठवल्या जात आहे .एवढेच नव्हे तर भारता बाहेर सुद्धा ह्या राख्यांना चांगली मागणी आहे .दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या हेल्पलाइन ०९४२३६५००९० क्रमांकावर संपर्क साधून राख्या खरेदी कराव्या .या राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार असल्याने विविध सामाजिक संस्था ,शाळा ,महाविद्यालय व महिला वर्गाद्वारा प्रतिसाद द्यावा,असे आव्हान संस्थेचे अनामिका देशपांडे , नीता वायकोळे , तपस्या गोलाईत , वैभवी गवई, प्रतिभा काटे, डॉ.संजय तिडके , विजय कोरडे , भारती शेंडे , श्वेता धावडे , पूजा गुंटीवार , दिपाली ढोले , अस्मिता मिश्रा , रोहित सूर्यवंशी व संचिता चव्हाण यांनी केले आहे .