चंद्रपूर -घुग्घूस मार्गावरील धानोरा फाटा येथून धानोरा येथे काही कामा निमित्ये पती -पत्नी जात असताना धानोरा येथून येणाऱ्या ट्रकची व दुचाकीची जबर धडक झाली यात सपन संतोष गाईन (40)वर्ष यांचा जाग्यावरच मृत्यू झाला तर त्याची पत्नी मंजू (35) वर्ष ही गंभीर जखमी झाली.
ही घटना धानोरा फाट्याजवळ असणाऱ्या धाब्या जवळ आज दुपारी 1 वाजता दरम्यान घडली. या घटनेची माहिती घुग्घूस पोलिसांना देण्यात आली पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मर्ग दाखल करून प्रेत शवविच्छेद करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या मंजूला उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रवींद्र वाभिटकर करीत आहे.