श्रीगुरुदेव सेवा मंडळ यवतमाळ (मानवता मंदिर) येथे सर्व संत स्मृती समारोह कार्यक्रमात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचाराचे साहित्य लिहून वृत्तपत्रामार्फत प्रचाराचे सातत्याने प्रयत्न करतात म्हणून श्री पुरुषोत्तम बैस्कार मोझरकर, गुरुदेव प्रचारक यवतमाळ यांचा सत्कार यवतमाळचे आमदार श्री बाळासाहेब मांगूळकर यांचे हस्ते करण्यात आला. मंचवर यवतमाळ जिल्हा सेवाधिकारी श्री ठाकरे दादा, यवतमाळ जिल्हा प्रचारक श्री दत्ताभाऊ मार्कंड, तालुका प्रचार समितीचे सदस्य श्री विलासभाऊ काळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. श्री बैस्कार दादा यांचा सत्कार श्री अशोक दादा ठाकरे, श्री जयस्वाल दादा, श्री महामुने दादा यांनी घडवून आणला.