सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील युवक स्वतःच्या दुचाकीने मित्रासोबत तेंदुपत्ता घेऊन जांभुळघाट-नेरी मार्गे गावाकडे परत येत असताना रामपूर- नेरी मार्गावर सुमारास समोरून वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. उपचाराकरिता चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अमित सूर्यभान शेंडे (२२) रा. पेंढरी असे मृतकाचे नाव आहे. चिमूर
तालुक्यातील पुयारदंड येथील जंगलामधून तेंदूपत्ता तोडायला पेंढरी येथील अमित सूर्यभान शेंडे हा आपला मित्र निशांत रामदास मांढरे याच्यासह गेला होता, तेंदूपाने तोडून स्वतःच्या दुचाकीने (क्रमांक एमएच३४ सीए ८११४) गावाकडे येण्याकरिता जांभुळघाट-नेरी मार्गाने निघाला होता. रामपूर-नेरीच्या मधात कापूस भरण्याकरिता नेरीवरून जांभुळघाट येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच ३४ बीजी १३७८) दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकी चालक अमित शेंडे याच्या जबड्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली.
चंद्रपूर येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यात निशात मांढरे हा जखमी आहे. पूढील तपास सुरू आहे.