कारंजा: स्थानिक गायकवाड नगर (जुना गॅड्डम बगिचा) बायपास कारंजा येथील,श्री शारदादेवी विसर्जनासाठी गेलेला,भाविक युवक गणेश देवकते यांचा ट्रकने उडविल्याने ,त्यात त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असून अतिशय आनंदमय वातावरणात श्री शारदेदेवीला विसर्जित करताना या आनंदात विरजण पडले. याबाबत सविस्तर वृत्त असे की दि 27/10/23 रोजी, साडेआठच्या सुमारास, इंझोरी येथील अडाण नदीच्या पुलावर श्री शारदादेवीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते.
त्यावेळेस भाविक आरती करत होते. दरम्यान कारंजा वरून मानोरा कडे भर धाव जाणारा ट्रक क्रमांक MH 04 CU4147 असलेल्या ट्रक चालकाने त्या भाविकास चिरडत नेले त्यामुळे या अपघातामध्ये भाविक युवक गणेश देवकते वय 37 रा. गायकवाड नगर कारंजा हे अत्यंत गंभीर झाले . या अपघाताची माहिती तात्काळ लक्ष्मी ज्वेलर्स संचालक मंगेश कडेल यांनी श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्नसेवक रमेश देशमुख यांना दिली असता तात्काळ रुग्णसेवक रमेश देशमुख घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी ऑर्थोपेटीक सर्जन डॉ.मोरे यांनी त्याच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. त्यावेळी मदतीसाठी कक्षसेवक पांडे, मेस्को सिक्युरिटी सागर खंडारे , प्रसन्ना काळबांडे , श्याम घोडेस्वार , संत गाडगेबाबा रुग्णवाहिकचे विनोद खोडे, छोटू उईके , राजूभाऊ ठाकरे , गुरुमंदीर रुग्णवाहिकाचे रमेश देशमुख , लक्ष्मी ज्वेलर्सचे मंगेश कडेल यांनी मदत केली.शारदा मातेची आरती करताना झालेला अपघात इतका भीषण होता की त्यात भाविक युवक गणेश देवकते हे बरेच दूर चीरडत गेले. यात त्यांचा अमरावती येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला . त्यामुळे गणेश देवकते यांच्या अवेळी जाण्याने गायकवाडनगर बायपास परिसरासह संपूर्ण कारंजा शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.