वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्हयातील सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेतील सभासद, मत्स्यव्यवसायातील कामगार, मत्स्यवर्धक तसेच मत्स्यव्यवसाय व मत्स्यव्यवसायाशी निगडीत बाबींमध्ये प्रत्यक्ष संबंध असलेले व्यक्ती यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (अपघात गटविमा योजना) या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबाबतची माहिती विहीत प्रपत्रात सादर करावी. तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा (अपघात गटविमा योजना) जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायाशी निगडीत व्यक्तींनी लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, वाशिम यांनी केले आहे.