कारंजा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम एच हक यांचे स्थानांतरण इंदापूर येथे झाल्याबद्दल त्यांना कारंजा तालुका वकील संघाच्या वतीने
दिनांक 9 मे रोजी निरोप देण्यात आला. यावेळी आयोजित कारंजा तालुका विधिज्ञ मंडळ वार्षिक स्नेहसंमेलन व व निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहन्यायाधीश सौ .सुप्रिया पुंड तर कारंजा तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एड. निलेश पाटील (कानकिरड ) सरकारी अभियोक्ता नीरज सबरदंडे व सहा. सरकारी अभियोक्ता एड. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत कारंजा तालुका विजय मंडळाचे पदाधिकारी एड. ज्योति बाजड, एड. स्वप्नील नायसे एड. राहुल बांडे, तसेच एड कांनतोडे एड राऊळ यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड.सुमंत बंडाळे यांनी केले यावेळी कारंजा तालुका विधीज्ञ मंडळाचे वतीने न्यायाधीश एम एच हक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ,यावेळी सहन्यायाधीश सुप्रिया पुंड तसेच जेष्ठ विधीज्ञ् ऍड. डी के. पिंजरकर, एड निलेश कानकीरड यांनी आपले विचार व्यक्त केले कारंजा न्यायालयात न्यायदानाचे काम करताना सर्वांचे सहकार्य प्राप्त झाल्यामुळे तीन वर्षाचा कार्यकाल हा माझ्या जीवनामध्ये स्मरणात राहील असे भावपूर्ण उदगार न्यायाधीश हक यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन एड रवी रामटेके यांनी केले.निरोप समारंभाला कारंजा तालुका विधीज्ञ मंडळाचे सदस्य तसेच कर्मचारी वृंद व अधीक्षक बेलखेडे आदीची उपस्थिती होती.