ब्रम्हपूरी शहरातील धुम्मनखेडा प्रभागात ३ बहीणी राहतात. परंतु ह्यांचे पालनपोषण करीत असलेले त्यांचे आजोबा हे काही दिवसांपूर्वी मृत्यू पावले त्यामुळे ह्या मुली निराधार झाल्या आहेत. ह्या मुलींची नावे कु. मनीषा भोयर वय १९ वर्ष, कु.साक्षी भोयर (वय १७ वर्ष), कु. अर्पिता भोयर (वय १५ वर्ष) अशी आहेत. ह्या तिन्ही मुली लहान असतांनाच यांचे आईवडील हे आजाराने मरण पावले. त्यानंतर आजी सुध्दा मरण पावली. ह्या तिन्ही मुलींचा सांभाळ आजोबा करीत होते. मात्र आता आजोबा सुध्दा मरण पावल्याने ह्या तिन्ही मुली निराधार झाल्या असून उदरनिर्वाह करतांना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
सदरची बाब महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. योगिताताई आमले यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर तिन्ही मुलींना कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना आर्थिक हातभार लागावा म्हणून आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत पाठवली आहे.
सदरची आर्थिक मदत देतांना महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. योगिताताई आमले, नगरसेविका सरिताताई पारधी, योगेशजी मिसार, माजी नगरसेवक जगदीश आमले, मालडोंगरीचे माजी सरपंच राजेश पारधी, सौ. रंजनाताई बुराडे, दुर्गाताई नागमोती, पद्माकर निखारे, चापलेजी यांसह अन्य यावेळी उपस्थित होते.