भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अधिवेशन दि.27 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक बांधकाम विभागाचे विश्राम गृह येथे संपन्न झाले.देवराव ऊईके सरपंच जवराबोडी यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पक्षाचे जिल्हासचिव कॉ.प्रा.नामदेव कनाके उपस्थित होते.अतिथी म्हणुन कॉ.विनोद झोडगे जिल्हा कौन्सिल सदक्ष,श्रीमती रेखा ताई धोंगडे माजी सरपंच सूरबोडी , उसन ठाकरे सदक्ष ग्राम पंचायत बोडधा उपस्थित होते.या अधिवेशनात शेतकरी , संघटित आणि असंघटित कामगार ,विद्यार्थी,युवक बेरोजगार व शेतमजुरांच्या प्रश्नावर चर्चा होऊन त्यांचे मागण्यांना घेऊन प्रखर लढा उभारण्याचे ठरले.
16 प्रतिनिधींची तालुका कौंसिल निवड करण्यात आली,आगामी 10 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे होणारया जिल्हा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी 20 प्रतिनिधींची निवड करण्यात आली.अधिवेशनात कॉ .विनोद झोडगे, कॉ.प्रा.नामदेव कनाके,रेखा धोंगडे व देवराव ऊइके यांनी मार्गदर्शन केले सदर अधिवेशनात ठराव पारित करण्यात आले ज्यामधे चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी, नागभिड व शिंदेवाही तालुक्याचा समावेश करू नये.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नव्यानी ब्रम्हपुरी जिल्ह्याची घोषणा करण्यात यावी.अतिक्रमण धारकांना वण जमिनीचा पट्टा व सातबारा देण्यात यावा. गैर आदिवासी करिता असलेली तीन पिढीची अट रद्द करण्यात यावी.
गांगलवाडी,मुडझा ते व्याहाड रोड चे नव्याने बांधकाम करण्यात यावे .वयाच्या 60 वर्षा वरील शेतकरी,शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक 5000 रू.पेन्शन देण्याचा कायदा करण्यात यावा.बेघर धारकांना घरकुल देऊन निधी मध्ये वाढ करण्यात यावी.त्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी किंवा घराचा पट्टा देण्यात यावा.ब्रम्हपुरी तालुक्यातील नर भक्षक वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा.जंगली प्राण्यांनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी यासह विविध ठराव पारित करण्यात आले.यावेळी तालुक्यातील 70 प्रतिनिधी उपस्थित होते.संचालन जयघोष दिघोरे तर आभार कलाम शेख यांनी मानले.