यवतमाळ : जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक २६ जुलै २०२५ रोजी शालेय सभागृहात भव्य इन्व्हेस्टिचर समारंभ उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपमाला भेंडे (पोलीस निरीक्षक, भरोसा सेल), शुभांगी गुल्हाणे (जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय), माधुरी उमबरकर (पोलीस निरीक्षक, कंट्रोल रूम), संतोष मनवर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), अभयकुमार गुप्ता (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सैनिक संस्थान तसेच सेवा निवृत्त इंडियन आर्मी, यवतमाळ), राजेश कोडापे (ज्येष्ठ अधिवक्ता, यवतमाळ जिल्हा न्यायालय) यांची उपस्थिती होती.
तसेच हरिकिशन जाजू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू, पूनम जाजू सचिव आशिष जाजू, संस्थांचे कोषाध्यक्ष अध्यक्ष तसेच डायरेक्टर प्रिंसिपल जाजू इंटरनॅशनल स्कूल शिल्पा जाजू आणि शाळेच्या समन्वयक सुचिता पारेख
या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी शाळेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यात आली होती. त्यातून निवडून आलेल्या सदस्यांना समारंभात सॅश व बॅचेस प्रदान करून शपथविधी घेण्यात आला. हेड बॉय म्हणून वीर बेलोर्कर, हेड गर्ल म्हणून गुंजन अग्रवाल, डेप्युटी हेड बॉय वेद तेलेवार, डेप्युटी हेड गर्ल लब्धी कोठारी यांनी शपथ घेतली.
स्पोर्ट्स कॅप्टन बॉय रिदंत खारकर, स्पोर्ट्स कॅप्टन गर्ल प्रबलीन पाबला यांनी जबाबदारी स्वीकारली. हाउस मॅनेजर अँडीज म्हणून – निर्भया मनवर, आल्प्स – परिधी अकोलकर, रॉकीज – साची काबरा, हिमालय – विश्वजा चौधरी यांनी शपथ घेतली. को-हाउस मॅनेजर म्हणून अँडीज– पार्थ बंग, आल्प्स – ओजस्वी देशमुख, रॉकीज – प्रिशा बंग आणि हिमालय – अनय दुदुलवार यांनी कार्यभार स्विकारला.
मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करत एक उत्तम व्यक्ती तसेच देशाचे utan लीडर बनून प्रतिनिधित्व करा असे आव्हान केले
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी गीत व नृत्य सादरीकरण करून समारंभाला रंगत आणली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन दीपाली रावेकर, अरुष अग्रवाल आणि सकीना बॉम्बेवाल यांनी केले.
समारंभ यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....