राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व विंगची संयुक्त बैठक महाराष्ट्र प्रदेश पातळीवर येत्या १२ जानेवारी २०२३ रोज गुरुवारला दुपारी १२ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, कॉंग्रेस नगर नागपूर येथे आयोजित केली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ .प्रकाश भागरथ यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत प्रदेश पातळीवरील राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवती महासंघ, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ, राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ व राष्ट्रीय ओबीसी महिला कर्मचारी-अधिकारी महासंघ अशा विविध विंगचे पदाधिकारी, संघटक व कार्यकर्ते उपस्थित राहतील असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेश काकडे यांनी एका प्रत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्यातील ओबीसी लोकांना विविध स्तरावर भेडसावणा-या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी करावयाचे उपाय व पुढील आंदोलनाची रूपरेषा व दिशा या राज्यस्तरीय बैठकीत ठरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी ते सरकार मात्र ओबीसी लोकांच्या जीवनावश्यक समस्यावरही गंभीर नसल्याचे चित्र राज्यतच नव्हेतर देशात आज निर्माण झाले असल्याची खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर यांनी व्यक्त केली आहे. भारतातील विविध राज्यात प्रदेश पातळीवर अशा ओबीसी लोकांच्या समस्यांना घेवून यापुढे बैठका आयोजित करण्यात येणार असून अशा मागण्या राष्ट्रीय ओबीसी महसंघाच्या अन्य राज्यातूनही होत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्याकडे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी भारतातील विविध राज्यातून वारंवार पोहचत असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या बाबत गंभीर होवून ओबीसी आंदोलन हे तीव्र करण्याचे ठरविले आहे. ओबीसींचे संवैधानिक आरक्षणच नव्हेतर अन्य शेकडो समस्या सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी भारतातील ओबीसी लोकांची अपेक्षा असल्यामुळे यापुढे अशा राज्यस्तरीय बैठका विविध राज्यात आयोजित करण्यात येतील असे महासचिव सचिन राजूरकर यांनी कळविले आहे. या महाराष्ट्र प्रदेश पातळीवरील बैठकीचे आयोजन निमंत्रक व प्रदेश महासचिव राजेश काकडे यांनी केले आहे.