चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथे काल दुपारी 2 वाजता दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने गावकऱ्यांची भंबेरी उडवली असून, अनेक घरावरील टिनाचे पत्रे, घरावरील कवेलू तर काहींच्या घरांची पडझड झाली. अनेक झाडे उन्मळून पडले आहेत.
अचानक दुपारी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. वादळाने रौद्र रूप धारण करीत नेरी-तळोधी मार्गावरील रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच या वादळी पावसाने क्षणात बोथली गावातील नागरिकांचे खूप मोठे नुकसान केले. अनेक झाडे पडली. काही घराची टिनपत्रे उडाले तर काहींच्या घरावरील कवेलू उडून गेले. घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे साहित्याचे नुकसान झाले.