अकोला : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी आज आमदार अमोलदादा मिटकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत पिकविमा प्रकरणे, वीजपुरवठा, सिंचन व्यवस्था, बाजारातील अडचणी तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच त्यांचे प्रश्न समन्वयातून मार्गी लागावेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार मिटकरी यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे ही शासनाची जबाबदारी असून, यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही आमदार मिटकरी यांनी या वेळी सांगितले.
बैठकीस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली