कारंजा (लाड) : आपल्या सोबतीला सदैव कुणी असो वारा नसो, परंतु आपल्या सावलीशी आपली जन्म जन्मांतराची सोबत आयुष्यभर असते. सुर्य नारायण जस जसा उगवतीच्या पूर्व क्षितीजावरून आकाशात आपल्या डोक्यावर व डोक्यावरून परत पश्चिम क्षितीजावर मावळतीला जातो. तसतशी आपली सावली मागे पुढे, लहान मोठी होत जाते. व जेथे आपण जातो तेथे आपल्या सांगाती रहाते. परंतु,ही सावली रविवार,दि.२५ मे २०२५ रोजी दुपारी १२:०० ते १२:३० वाजेच्या जवळपास एकूण ५२ सेकंद पर्यंत आपली साथ सोडणार आहे. रविवार दि २५ मे २०२५ रोजी , खगोलशास्त्राचा हा अद्भुत चमत्कार आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. रविवारी दि २५ मे रोजी दुपारी १२:०० ते १२:३० चे दरम्यान, आपल्या प्रत्येक व्यक्तींची सावली ५२ सेकंदांसाठी साथ सोडणार असल्याचे खगोलशास्त्रज्ञ सांगत आहेत.
'शून्य सावली दिवस'हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. कारण ह्या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटांसाठी सोडून जाते. सध्या राज्यासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शून्य सावली दिवस अनुभवता येत नसला तरी वातावरण निवळले तर अनुभवता येणार आहे.पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही.तो सदैव उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो. पण, या दोन टोकाच्या वृत्तांमधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो.अर्थात जेव्हा सूर्य डोक्यावर आलेला असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे. खगोलप्रेमींनी माहिती दिल्यावरून दि .२५ मे रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान ५२ सेकंदांसाठी आपली सावली गायब होण्याचा अनुभव प्रत्यक्ष घ्यावा,असे आवाहन छोटे जिज्ञासू विद्यार्थी विद्यार्थीनी कु. समृद्धी कमलेश कडोळे,चि. अर्थव कमलेश कडोळे,कु. संस्कृती दिनेश कडोळे,चि. संस्कार दिनेश कडोळे यांनी केले आहे.
वर्षातून दोन वेळा अनुभव, सावली नेमकी जाते कुठे? सूर्य डोक्यावरून जात असतो, तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र, ज्यावेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्याला ‘शून्य सावली’ असे म्हणतात. सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडले असून, राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येणे शक्य आहे. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. दि . २५ मे २०२५ नंतर पुन्हा एकदा शून्य सावलीचा दिवस असणार आहे.असे वृत्त साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांनी केले आहे.