विधुत तारांच्या स्पर्शाने तीन म्हशी दगावल्याची घटना तालुक्यातील चिकमारा येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शेतकऱ्याचे अंदाजे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. चिकमारा येथील अरुण रघुनाथ बोरकुटे हा व्यक्ती गावातील म्हशी व गुरे राखतो. तो नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता शेतशिवारात म्हशी चराईसाठी गेला होता. दरम्यान, विदर्भात मागील काही दिवांपासून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरु असून आलेल्या वादळी पावसामुळे परिसरात विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. गुराखी याला माहिती नसल्यामुळे म्हशी चारत असतांना अचानक म्हशीला जीवत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तीन म्हशी घटनास्थळीच दगावल्या. तर अन्य जनावरे अरुण बोरकुटे यांनी वेळीच बाजूला केल्याने बचावल्या आहेत. घटनेची माहिती नागभीड पोलीस ठाणे आणि तलाठ्याला देण्यात आली आहे. शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.