अकोला- न्यू तापडीया नगरजवळ अकोल्यात खरप बु.येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीउत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी आंबेडकर स्मारक समिती व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने दिप प्रज्वलन तथा पुष्पमाला अर्पण करून बाबासाहेवांना आदरांजलीसह संयुक्तपणे विनम्र अभिवादन केले.
खरप येथील आनंद वाटीकेमध्ये श्री आनंद इंगळे व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी आनंद इंगळे यांचेसह विक्रम इंगळे,मिलींद बनसोड,प्रल्हाद इंगळे,रामराव भटकर,दिलीप सिरसाट,शेषराव इंगळे,हरिदास खळे,महादेवराव इंगळे,उपासिका ताईबाई इंगळे,कैलास इंगळे,गोलू बनसोड,दिक्षा इंगळे,हर्षा इंगळे,हे उपस्थित होते.यावेळी सुरेखा खडे या मुलीने प्रवेशव्दारासमोर सुबक रांगोळी काढून सुशोभिकरणात भर टाकली.