वाशिम : गेल्या चार दिवसा पासून सुरु असलेल्या सततधार पाऊसामुळे नदी नाले तुडूंब भरून वहात आहेत तर धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे . लाखो रुपयांची बि बियाणे शेतात टाकून चांगल्या पिकाची अपेक्षा करणाऱ्या बळीराजाच्या शेतजमीनींना तलावाचे रूप प्राप्त होत आहे .वाशिम जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतजमीनीतील पिके उध्वस्त झाल्यात जमा असल्याची बळीराजाची तक्रार आहे. सततधार पावसाने कित्येक ग्रामस्थांची घरे जमिनदोस्त झाली. तर काही खेडेगावात जीवीत हानी सुद्धा झाली . पुरामुळे शहरांशी संपर्क तुटला . ग्रामस्थांचा रोजगार बुडाला. त्यामुळे शासन प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे त्वरीत पंचनामे करावेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच उपेक्षीत असलेल्या आमच्या वाशिम जिल्ह्याला त्वरीत भेट देऊन, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून त्वरीत मदत करावी असी मागणी शेतकर्या कडून होत असल्याचे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .