5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलच्या प्रशालेचे *मुख्याध्यापक विष्णू मोरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार* पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सागर देशपांडे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, अध्यक्ष प्रसाद गायकवाड, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव किशोर बोरसे, कार्याध्यक्ष दिलीप काळे, हरिश्चंद्र गायकवाड उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर यांना गौरविण्यात आले.
शैक्षणिक, सामाजिक, युवा जागृती, पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रात विष्णू मोरे यांनी भरीव योगदान दिल्यामुळे या कार्याची दखल घेऊन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी मुख्याध्यापक संघातर्फे सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र तर व रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर यांच्यावतीने शाल, पगडी, प्रमाणपत्र, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.